मुंबई : इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहोचलेला गायक पवनदीप राजनने (Pawandeep Rajan) मराठीत पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील सगळीच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. पण सिनेमात एक सुंदर सरप्राईज भेटणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातील 'सतरंगी झाल्या रे' या गाण्यावर विशेष प्रेम आहे. हे गाणं पवनदीप राजन याने संगीतबद्ध केलं आहे. तसेच पवनदीपचा पहाडी आवाजही या गाण्याला लाभला आहे. पवनदीप आणि आनंदी जोशीने हे गाणं गायलं आहे. 



गणेश मतकरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पवनदीप राजनचं कौतुक केलं आहे.



महेश मांजरेकर हे नेहमीच अनोखा विषय हाताळतात. मांजरेकरांनी आतापर्यंत काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली आहे. ‘पांघरूण’हा एक चित्रपट नसून ही एक कलाकृती आहे.


महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे.


पांघरूण हा सिनेमा ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओचा पांघरूण हा सिनेमा गेली दोन वर्ष थिएटरची आणि प्रेक्षकांची वाट पाहत आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत उत्सुकता मोठी आहे.